अपरान्त साहित्य कला प्रबोधिनी – रत्नागिरी जिल्हा शाखा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जागृती मंडळ, आंबडवे यांचे जयंतीच्या पूर्वसभेला संयुक्त आयोजन
मंडणगड (प्रतिनिधी ): अपरान्त साहित्य कला प्रबोधिनी (नोंदणीकृत)- जिल्हा शाखा रत्नागिरीआणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जागृती मंडळ, आंबडवे यांच्या संयुक्त विद्यमाने विश्वभूषण प्रज्ञासूर्य, भारतरत्न, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीच्या पूर्वसंध्येला जिल्हास्तरीय,’अपरान्त साहित्य कला संमेलन’ रविवार दिनांक 13 एप्रिल 2025 रोजी बाबासाहेबांच्या मूळ गावी आंबडवे येथे आयोजित करण्यात आले आहे.
या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी मासिक सम्मासंबुद्धचे संपादक आणि अपरांत साहित्य कला प्रबोधिनीचे जिल्हाध्यक्ष संजय गमरे तर उद्घाटक म्हणून आंबडवे गावचे ज्येष्ठ सल्लागार सुदाम सकपाळ, स्वागताध्यक्ष म्हणून आंबडवेचे मुंबई अध्यक्ष महेंद्र सकपाळ , ग्रामीण अध्यक्ष सुदर्शन सकपाळ हे उपस्थित राहणार आहेत. दुपारी २ वाजता या कार्यक्रमाचे उद्घाटन सत्र पार पडणार आहे. यावेळी अपरान्त साहित्य कला प्रबोधिनीचे केंद्रीय सरचिटणीस तथा पत्रकार संदेश पवार, ज्येष्ठ सामाजिक राजकीय कार्यकर्ते दादासाहेब मर्चंडे , जिल्हा सरचिटणीस सुनील जाधव, केंद्रीय सहहिशेब तपासणीस तथा ज्येष्ठ साहित्यिक राष्ट्रपाल सावंत, लेखक नथुराम जाधव, कवी किशोर कासारे, शाहीर विश्वजीत लोखंडे, सामाजिक कार्यकर्ते रजनीकांत धोत्रे, चंद्रकांत घाटगे, राजेश गमरे, राजेश मर्चंडे, नगरसेवक आदेश मर्चंडे, नगरसेवक हरेश मर्चंडे, प्रमोद जाधव, शांताराम पवार , प्रा. मारुती कांबळे या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. उद्घाटन कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब मर्चंडे, शाहीर विश्वजीत लोखंडे, लेखक नथुराम जाधव, लेखक चंद्रकांत घाटगे व रजनीकांत धोत्रे यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे तर नितीनचंद्र सकपाळ व शांताराम पवार (मुख्याध्यापक) यांचे विशेष मनोगत होणार आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील जाधव तर आभार प्रदर्शन किशोर कासारे करणार आहेत.
दुसऱ्या सत्रात “पुस्तकावर बोलू काही” हा परिसंवाद दुपारी ३.३० वाजता होणार असून त्यामध्ये पत्रकार संदेश पवार यांच्या ‘ पुरोगामी महाराष्ट्र उजव्या वळणावर ‘ या पुस्तकावर सुनील जाधव , चित्रकार लेखक चंद्रकांत घाडगे यांच्या ‘ बेधडक ‘ या पुस्तकावर भा.ला. टूले, कवी किशोर कासारे यांच्या ‘ पोसोन ‘ या पुस्तकावर धम्मचारी सत्यसिद्धी, नथुराम जाधव यांच्या ‘ महामाता रमाई ‘ या पुस्तकावर किशोर कासारे मांडणी करणार आहे . या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान नथुराम जाधव ,स्वागताध्यक्षस्थान आदेश मर्चंडे, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्तम पवार तर आभार पी. बी. जाधव मानणार आहेत.
तिसऱ्या सत्रात सायंकाळी ४.३० वाजता अपरांत कवी संमेलन कवी किशोर कासारे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे. त्यामध्ये नयन गमरे, सुनीत गमरे, धम्मचारी सत्यसिद्धी, सतीश खैरे, जयेश जाधव, मनोज लोखंडे, रवीकुमार जाधव, सुशील शिर्के, संदेश पवार, सुनील जाधव, संजय कांबळे, संतोष मोहिते, राजेश जाधव, राजेश इंगळे, श्रेया पवार, सिद्धी कासारे, प्रणाली गमरे, प्रमोद गमरे, अनिल जाधव कविता सादर करणार आहे. या कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्षस्थान रेशमा मर्चंडे, सूत्रसंचालन राजेश जाधव तर आभार मनोज लोखंडे मानणार आहेत .
चौथ्या सत्रात सायंकाळी ५.३० वाजता सुप्रसिद्ध साहित्यिक राष्ट्रपाल सावंत यांच्या ‘ गतस्मृतींची गजबज ‘ या पुस्तकाचा परिचय पत्रकार संदेश पवार करणार आहेत.
पाचव्या सत्रात सायंकाळी ६.०० वाजता समारोप केला जाणार असून त्यावेळी सर्व सत्रातील मार्गदर्शक, वक्ते , कवी, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत . या सत्राचे अध्यक्षस्थान प्रमोद जाधव भूषवणार असून सूत्रसंचालन सुनील जाधव तर आभार प्रदर्शन धम्मचारी सत्यसिद्धी करणार आहेत. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील साहित्य रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करावे , असे आवाहन अपरांत साहित्य कला प्रबोधिनीचे जिल्हा सरचिटणीस सुनील जाधव व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जागृती मंडळ आंबडवेचे सुदर्शन सकपाळ यांनी केले आहे.










