रत्नागिरी ः प्रतिनिधी
जांभळे काढत असताना झाडावरुन पडून गंभिर जखमी झालेल्या तरुणाचा खासगी रुग्णालयात उपचारांदरम्यान मृत्यू झाला. ही घटना सोमवार 19 मे रोजी रात्री 12 वा.सुमारास घडली.
दिपक विलास पवार (27,रा.कोळंबे मधला वठार,रत्नागिरी) असे उपचारांदरम्यान मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. दिपक हा कोळंबे येथील प्रविण दामले यांच्याकडे मजुरीचे काम करत होता. 15 मे रोजीही तो त्यांच्याकडे कामाला असताना कोळंबे,खांबाचा मळा येथील जांभळाच्या झाडावरील जांभळे काढत असताना त्याचा पाय घसरुन खाली पडला. यात त्याच्या पोटाला,डाव्या हाताला आणि डाव्या पायाला गंभिर दुखापत झाली. गावातील लोकांनी त्याला तातडीने प्रथम साफल्य हॉस्पिटलमध्ये नेउन अधिक उपचारांसाठी चिरायू हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. त्याठिकाणी उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी पूर्णगड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.











