भरधाव वेगाने जाणारी कार कोसळली ७० ते ८० फूट दरीत

मुंबई गोवा महामार्गावर वाकेड येथील घटना
कार वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने झाला अपघात

लांजा (प्रतिनिधी) मुंबईहून गोव्याच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने ही कार थेट मुंबई गोवा महामार्ग लगत असणाऱ्या ७० ते ८० फूट दरीत जाऊन कोसळली. हा अपघात आज शनिवारी २४ मे रोजी सकाळी ९.३० वाजता वाकेड येथे झाला. या घटनेत एक महिला महिला जखमी झाली असून उर्वरित चार प्रवासी बालंबाल बचावले आहेत .

याबाबत अधिक घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, स्वेन मोर्जेलो (वय २१ आगाशे, विरार पश्चिम) हा आपल्या ताब्यातील कार (क्रमांक एम एच ०३ डीजी २४५१) घेऊन मुंबई येथून गोव्याच्या दिशेने चालला होता. लांजा तालुक्यातील वाकेड घाटी येथे कालचालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि ही कार थेट ७० ते ८० फूट दरीत जाऊन कोसळली. यामध्ये कारमध्ये बसलेल्या प्रवाशांपैकी एका महिलेच्या पायाला दुःखात होवून किरकोळ जखमी झाली. तसेच.क्लाइड डिसोजा (वय ५६ मालवणी मालाड), फ्लाबिया फर्नांडिस (२६ बोरिवली वेस्ट गोराई), कु.रियोना (वय १८आर्लेम गोवा) हे सर्व प्रवासी बालंबाल बचावले. सर्व प्रवाशांचे दैव बलवत्तर म्हणून हे ते अपघातून बालंबाल बचावले आहेत मात्र अपघातात गाडीचे नुकसान झाले आहे.