नॅब रुग्णालयात १ जून रोजी दृष्टीबाधीतांसाठी ‘स्नेह मेळावा ‘

हेलन केलर’ याच्या जन्मदिना निमित्त आयोजन 

सावंतवाडी : १ जुन रोजी ‘हेलन केलर’ याच्या जन्मदिना निमित्त नॅब नेत्र रुग्णालय, भटवाडी सावंतवाडीच्या वरच्या मजल्यावरील नॅब सभागृहामध्ये दृष्टीबाधीतांसाठी स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ११ वाजता या कार्यक्रमाला सुरूवात होईल. कार्यक्रम संपल्यानंतर भोजनाची व्यवस्था केलेली आहे. दृष्टीबाधीतांना येण्याजाण्याचा प्रवासखर्च देण्यात येईल. तरी या कार्यक्रमासाठी जास्तीतजास्त दृष्टीबाधीतांनी उपस्थित रहावे असे आवाहन नॅब सिंधुदुर्गचे अध्यक्ष, सचिव व खजिनदार यानी केले आहे.