खेड(प्रतिनिधी)खेड तालुक्यातील मुरडे रेवाळे हायस्कूल येथे १९९९ मध्ये १० वि मध्ये शिकणारे विद्यार्थी तब्बल २५ वर्षांनी सर्वजण एकत्र येत स्नेह मेळावा पार पाडला या निमित्ताने जुन्या आठवणीना उजाळा देत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली यावेळी अनेकानी आयुष्यात आलेले अनुभव देखील व्यक्त केले
यावेळी सर्व उपस्थितांचे स्वागत करण्यात आले यावेळी सहविचार सभा देखील घेण्यात येऊन एक कमिटी स्थापन करून कार्यकारिणी जाहीर करण्यात आली त्या मध्ये अद्यक्ष पदी प्रभाकर खेडेकर , सचिव पंकज मिरजोळकर, खजिनदार दीपक मोहिते यांची निवड करण्यात आली तर सल्लागार पदी प्रकाश रेवाळे, नितीन जाबरे, निलेश धुत्रे ,नरेंद्र शिंदे, पराग मिरजोळ कर , तसेच महिला प्रतिनिधी मध्ये शिल्पा मोरे, शुभांगी गायकवाड, शर्मिला धुत्रे,कुंदा शिबे, यांची निवड करण्यात आली
या सभेत शाळा हायस्कूल मधील गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात देण्या बाबत चर्चा करण्यात आली तसेच सर्वांच्या सुख दुःखात सहभागी होणे आदी विषयावर चर्चा करण्यात आली कार्यक्रमाचे सूत्र संचालन व आभार श्रीकांत शिगवण यांनी मानले












