दापोली Breaking: लाडघर येथील पर्यटन व्यावसायिकाचा विजेचा धक्का लागून मृत्यू

दापोली | प्रतिनिधी:

दापोली तालुक्यातील लाडघर येथे एकाचा शॉक लागून मृत्यू

लाडघर येथील सुनील होलम हे लाडघर येथे घरामध्ये इन्व्हर्टाचे काम करीत होते

त्यावेळी त्यांना विजेचा जोरदार धक्का लागला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला

लाडघर औदुंबर वडी येथे सुनील होलम हे अनेक वर्ष पर्यटनाचा व्यवसाय आहे

हॉटेल सुखसागरचे ते मालक असून सुमारे वीस वर्षे ते हा व्यवसाय करत होते

मंगळवारी दुपारी घरात इन्व्हर्टरचा काम करत असताना विजेचा धक्का लागला यात ते अस्वस्थ झाले त्यांना रिक्षातून दापोली येथे रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र वाटत असताना त्यांचा मृत्यू झाला

शव विच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे