चिपळूण गुन्हे प्रकटीकरण शाखेची कारवाई
चिपळूण । प्रतिनिधी :चिपळूण तालुक्यातील खेर्डी शिगवणवाडी मुस्लिम मोहल्ला येथे गांजा बाळगणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे.
शुक्रवारी ६ जून रोजी, ही कारवाई करण्यात आली. चिपळूण पोलीस ठाणे येथील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे, पोलीस उपनिरीक्षक श्री. हर्षद हिंगे यांना गोपनीय बातमीदाराकडून याची माहिती मिळाली होती. त्यानुसार खेर्डी शिगवणवाडी मुस्लिम मोहल्ला येथे त्यांनी तत्काळ एक पोलीस पथक रवाना केले. या पथकाला तेथील एका घराचे पुढे एक इसम आपल्या समोर एक पिवळ्या रंगाची कापडी पिशवी घेऊन बसलेला दिसला. त्याचा या पथकाला संशय आल्याने त्यास लागलीच ताब्यात घेण्यात आले व त्याला त्याचे नाव-गाव विचारले असतं त्याने आपले नाव रुकनुद्दीन इब्राहीम बंदरकर, (65 वर्षे रा. खेर्डी शिगवणवाडी, मुस्लिम मोहल्ला ता. चिपळूण, जि. रत्नागिरी ) असे सांगितले.
लागलीच या पथका मार्फत दोन पंचांसमक्ष त्याची अंग झडती घेण्यात आली. तेव्हा याच्या अंगझडती मध्ये एक पिवळ्या रंगाची कापडी पिशवी व त्यात दुसरी प्लॅस्टिकची पिशवी व त्यामध्ये काळपट हिरवट रंगाची पाने, फुले, काड्या व बिया असलेल्या वनस्पतीचे शेंडे असलेला “गांजा” सदृश्य अंमली पदार्थ मिळून आलेला आहे.
त्यानंतर त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून एकूण ₹ 19,620/- किमतीचा 327 ग्रॅम वजनाचा “गांजा” हा अमली पदार्थ जप्त करण्यात आलेला आहे. या बाबत चिपळूण पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 133/2025 गुंगी कारक औषधिद्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 चे कलम 8 (क), 20 (ब), ii (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
ही, कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक, श्री. नितीन दत्तात्रय बगाटे व मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती. जयश्री गायकवाड तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी, चिपळूण श्री. राजेंद्र राजमाने यांचे मार्गदर्शनाखाली चिपळूण पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्री. फुलचंद मेंगडे, व खालील नमूद पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.
1) पो.उ.नि. श्री. हर्षद हिंगे,
2) पो. हवा/1151 श्री. वृषाल शेटकर,
3) पो. हवा/617 श्री. संदीप मानके,
4) पो.ना/1533 श्री. रोशन पवार,
5) पो.थी/1322 श्री. कृष्णा दराडे व
6) पो.शी/1444 श्री. प्रमोद कदम. यांनी केली












