साखरपा बसस्टॅण्डवर प्रवाशाच्या पर्समधून अडीच लाखांचे सोन्याचे दागिने लांबवले

रत्नागिरी :
साखरपा बसस्टॅण्ड येथे संगमेश्वर तालुक्यात दिनांक १६ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ९:३० वाजता फिर्यादी सौ. विनिता विकास अवसरे व त्यांचे पती बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्याने फिर्यादीच्या पर्समधील छोट्या पाकिटातून २,५०,००० रुपये किमतीचे पाच तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र व १५,००० रुपये किमतीची साडेतीन ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, असे एकूण २,६५,००० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लावून नेले. घटनेनंतर फिर्यादीची प्रकृती बिघडल्याने त्यांनी १७ सप्टेंबर २०२६ रोजी उशिराने देवरुख पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ३०३(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.