खेडमध्ये १० पासून महाराजस्व समाधान शिबीर

खेड (प्रतिनिधी)तालुक्यातील महसूल विभागांतर्गत शेतकरी, विद्यार्थी व महिलांच्या प्रश्नांचे निराकरण करून तक्रारींचा निपटारा करण्यासाठी तहसीलदार सुधीर सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली १० ते १३ जून या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

 

 

 

 

कुळवंडी महसूल गावात १० जून रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ यावेळेत श्री शिवशंकर माध्यमिक विद्यालय, ११ रोजी भोस्ते ग्रामपंचायत कार्यालय, आवाशी ग्रामपंचायत कार्यालय, आंबडस येथील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, १२ रोजी तळे येथे श्रीकांत शिर्के यांच्या घरासमोर धामणंद येथील महालिंग मंदिर, तुंबाड येथील श्रीकृष्ण मंदिर, दस्तुरी येथील जि. प. शाळेत शिबिराचे आयोजन करण्यात आले. १३ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वा. आंबवली जि. प. शाळेसमोरील सभागृह आणि तहसील कार्यालय सभागृहात शिबीर पार पडेल.

 

 

 

 

या शिबिरात उत्पन्नाचा दाखला, रहिवास, डोंगरी दाखले, वय अधिवास, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र, जातीचा दाखला, नॉनक्रिमिलियर, संजय गांधी निराधार योजना, रेशनकार्ड विषयक कामे, पीएम किसान, मतदार नोंदणी, सातबारामधील दुरुस्ती, आधार विषयक कामे, जिवंत सातबारा मोहीम आदी सोयी-सुविधा उपलब्ध करून देत समस्यांचे निराकरण करण्यात येणार आहे. या शिबिराप्रसंगी बहुसंख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन तहसीलदार सुधीर सोनावणे यांनी केले आहे.

 

 

 

 

खेड पन्हाळजे मध्ये देशी विदेशी मद्य जप्त एकावर गुन्हा

 

 

 

 

खेड(प्रतिनिधी)

 

 

 

 

खेड तालुक्यातील पन्हाळजे माळवाडी येथे येथील पोलिसांनी टाकलेल्या धाडीत ६१६० रु किमतीचे देशी विदेशी मद्य जप्त करण्यात आले असुन एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई ६ जून रोजी करण्यात आली

 

 

 

 

या प्रकरणी विवेक नागेश तोडणकर, वय- ५९ वर्षे, रा. पन्हाळजे, माळवाडी ता. खेड याच्याव र गुन्हा दाखल करण्यात आला आहे

 

 

 

 

संशयित हा राहते घराच्या पाठीमागील मोकळ्या जागेत गैरकायदा बिगरपरवाना देशी- विदेशी दारुच्या बाटल्या विक्री करण्याच्या उद्देशाने स्थितीत मिळुण आले म्हणुन.त्याच्या कडून ६१६० रु.कि.चा मुद्देमाल जप्त करण्यात आला