शिरगांव ( प्रतिनिधी)कोकण श्रमिक बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने फेब्रुवारी व मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या दहावी व बारावीच्या परीक्षांमध्ये 80 टक्के किंवा त्याहून अधिक गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात येणार आहे.
या उपक्रमांतर्गत संबंधित शाळांतील अशा गुणवंत विद्यार्थ्यांची नावे सायली तेली (मो. 8080371485) किंवा दीपा मगम (मो. 7821802611) यांच्याकडे लवकरात लवकर पाठवावीत, असे आवाहन कोकण श्रमिक बांधकाम कामगार संघटनेचे उपाध्यक्ष श्री. संतोष तेली यांनी केले आहे.












