### हरिनाम सप्ताहानिमित्त नितेश राणे यांची आनंदवाडीतील विठ्ठल मंदिराला भेट
विठ्ठल-रखुमाई मंदिराच्या ट्रस्ट कडून पालकमंत्र्यांचा सत्कार
देवगड तालुक्यातील आनंदवाडी येथील विठ्ठल मंदिरात सुरू असलेल्या हरिनाम सप्ताहानिमित्त सिंधुदुर्गचे पालकमंत्री तथा बंदर विकास व मत्स्य व्यवसाय मंत्री नामदार नितेश राणे यांनी रविवारी मंदिराला भेट देऊन विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेतले.
यावेळी विठ्ठल-रखुमाई मंदिर मंडळाचे अध्यक्ष प्रदीप कोयंडे यांनी पुष्पगुच्छ देऊन नामदार नितेश राणे यांचा सत्कार केला. तसेच आनंदवाडी क्रिकेट क्लबचे अध्यक्ष गुरुनाथ तारी हेही उपस्थित होते.
या प्रसंगी माजी आमदार अजित गोगटे, बाळ खडपे, योगेश चांदोसकर, वैभव कळंगुटकर, दयानंद पाटील, प्रकाश राणे, शरद ठूकरुल, तनवी चांदोस्कर, बुवा तारी, सर्व नगरसेवक तसेच अन्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हरिनाम सप्ताहामुळे आनंदवाडी परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.












