परुळे सुतारवाडी येथील कृष्णा मेस्त्री यांच्या घरावर जुने वडाचे झाड पडल्याने नुकसान

 

परुळे/प्रतिनिधी

मुसळधार पावसामुळे परुळे सुतारवाडी येथील कृष्णा भीवा मेस्त्री यांच्या घरावर जुने वडाचे झाड उन्मळून पडले त्यामुळे घरांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे.

दिवसभर मुसळधार पडणार्‍या पावसाने परिसरात हजेरी लावली आहे. यावेळी मेस्त्री यांच्या घरा बाजुला असलेले झाड मध्यरात्रीचे वेळे उन्मळून पडले त्यामुळे घरांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणतीही जिवितहानी झाली नाही मेस्त्री कुटुंबा वर चार दिवसात दोन आघात झाले आहेत नुकतंच त्यांच्या भाऊ संतोष भिवा मेस्त्री यांचे अल्प आजाराने निधन झाले त्यातून सावरत असताना ही नैसर्गिक आपत्ती आली त्याबाबत हळ हळ व्यक्त होत आहे यावेळी सरपंच प्रणिती आंबडपालकर माजी सभापती निलेश सामंत उपसरपंच संजय दूधवडकर सदस्य प्रदीप प्रभू प्रसाद पाटकर सीमा सावंत यानी भेट देत पाहणी केली. ग्राम महसूल अधिकारी श्री आर आर गवते कोतवाल स्वप्निल वरक यानी भेट देत नुकसानीचा पंचनामा केला. माजी सभापती निलेश सामंत यांनी मेस्त्री यांना रुपये 10000 ची तात्काळ मदत केली. सुदैवाने मोठा अनर्थ टळला घराच्या माडीवर मुंबईहून आलेली पाहुणे मंडळी झोपत होती मात्र ही घटना घडली त्याच दिवशी संध्याकाळी पाहुणे मडळी मुंबईला गेल्याने बचावली घराचावरचा भाग माडीवर येऊन कोसळला मात्र माडीच्या खाली झोपलेली घरातील कुटुंबातील व्यक्ती या अपघातानंतर तात्काळ घरातून बाहेर पडली