प्रथमेश ढोके युवकाचा अल्पशा आजाराने मृत्यू

देवगड / प्रतिनिधी

 

मूळ जामसंडे- कट्टा येथील व वास्तव्यास देवगड येथे असलेल्या कु. प्रथमेश संजय ढोके (३०) या युवकाचे मंगळवारी सकाळी अल्पशा आजाराने कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. बबलू या नावाने तो सुपरिचित होता. पश्चात आई, वडील, बहिण असा परिवार आहे. कु. प्रथमेश हा कट्टा गावातील सार्वजनिक उत्सवांमध्ये नेहमीच हिरहिरीने सहभाग घेत असे. सदा हसतमुख चेहरा व गावातील प्रत्येक सामाजिक, धार्मिक कार्यात तो आघाडीवर असे. त्याच्या अकाली निधनामुळे गावात तसेच देवगड परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मच्छीमार संजय ढोके यांचा तो मुलगा होता. त्याची आईदेखील मत्स्य विक्रेती आहे.