दापोली l प्रतिनिधी :-दापोली तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणून उंबर्ले प्राथमिक आरोग्य केंद्र यांची निवड झाली. त्याचबरोबर या केंद्र अंतर्गत असणाऱ्या जालगांव उपकेंद्राची सलग दुस-या वर्षी “कायाकल्प” पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
“कायाकल्प” ही लोकाभिमुख आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा सुनिश्चित करणारी योजना आहे आरोग्य संस्थांना स्वच्छ,सक्षम, विश्वासार्ह दर्जा आणि लोकाभिमुख बनवण्याचे एक प्रभावी पाऊल आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीने देण्यात येणा-या २०२४-२५ या कायाकल्प पुरस्काराची घोषणा नुकतीच करण्यात आली. उपकेंद्राच्या डॉ.प्रफुल्ल क्षीरसागर- वैद्यकीय अधिकारी उंबर्ले, अश्विनी सिरसवाल- समुदाय आरोग्य अधिकारी, पल्लवी आंबेडे,अर्पिता सावर्डेकर-आरोग्य सेविका, विजया तांबट मदतनीस
पराग दळवी-आरोग्य सेवक, आशा स्वयंसेविका स्मिता सकपाळ, अस्मिता धाडवे, अंकिता भांबिड,रसिका राऊत, सुप्रिया गुंदेकर, ऐश्वर्या तांबट आशा स्वयंसेविका या सर्वांच्या अथक परिश्रमामुळे आणि ग्रामपंचायत जालगांवने केलेल्या सहकार्यातून जालगांव उपकेंद्राला पुरस्कारप्राप्त उपकेंद्र हा किताब मिळवण्यात यश आले आहे.
जालगांव गावाच्या गावसईने तसेच ग्रामपंचायतीच्या वतीने या सर्वांचे अभिनंदन करुन शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.











