जि.प.पूर्ण आदर्श मराठी शाळा मेर्वी शाळेत चार चाकी गाडीतून विद्यार्थ्यांचा प्रवेशोतसव

गावखडी /वार्ताहर
रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श मराठी शाळा मेर्वी शाळेत पहिलीतील विद्यार्थ्यांचा ,नवागतांचा प्रवेशोतसव ढोल ताशांच्या गजरात चार चाकी वाहनातून विद्यार्थ्यांना मेर्वी शाळेत आणण्यात आहे.त्यानंतर नवागत विद्यार्थ्यांचे पंचारती ओवाळून पहिलीतील मुलांना फुगे ,फुले ,भेटवस्तू उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देऊन भव्य स्वागत शाळेच्या वतीने करण्यात आले.तसेच पहिले पाऊल म्हणून पहिलीतील विद्यार्थ्यांच्या पायाचे ठसे घेत पाऊलखुणा जपल्या आहेत.
नवीन शैक्षणिक वर्षांत या चिमुकल्यांचा आनंदाने प्रवेश घडवून आणण्यात आला. श्री सरस्वती देवीला वंदन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. याप्रसंगी जि.प.पूर्ण प्राथमिक आदर्श मराठी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. शर्वरी करगुटकर, उपशिक्षक श्री.चंद्रशेखर पेटकर ,उपशिक्षिका संजया पावसकर , शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.मंगेश म्हादये, शिक्षणतज्ञ श्री.संतोष कुरतडकर, सदस्या सौ.क्रांती कुरतडकर, ऐक्यवर्धक संघ मेर्वीचे अध्यक्ष श्री.हेमनाथ खरडे ,उपाध्यक्ष प्रेमानंद आंब्रे, खजिनदार वामन मेस्त्री, माजी पोलीस पाटील श्री. सुरेश खरडे , माजी सरपंच शशिकांत म्हादये , एकनाथ गोठणकर, गोकुळ खरडे ,मारूती खरडे , प्रकाश खरडे , जनार्दन मेस्त्री, संदीप मांडवकर, विकास हातणकर, जनार्दन चंदूरकर, मनोहर म्हादये , शुभांगी कुरतडकर, क्रांती कुरतडकर, सोनल म्हादये , पोलीस पाटील शैलेश कुरतडकर, श्री.गुरव ,किरण मांडवकर, अजय मेस्त्री, सिद्धू पावसकर, दिपाली भूते आणि सर्व पालक, विद्यार्थी यांची उपस्थिती लाभली होती.
प्रास्ताविकात उपस्थित मान्यवरांचा परिचय व कार्यक्रमाचा हेतू उपशिक्षक श्री.चंद्रशेखर पेटकर यांनी विशद केला.उपस्थित मान्यवरांचे स्वागत मुख्याध्यापिका सौ.शर्वरी करगुटकर यांनी केले. या कार्यक्रमात शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके आणि शालेय गणवेश वितरण करण्यात आले .तसेच सर्व विद्यार्थ्यांना शाळेच्यावतीने पेढे ,श्री. सुरेश खरडे आणि श्री. एकनाथ गोठणकर यांचेकडून
बुंदीचे लाडू ,वामन मेस्त्री, सिद्धू पावसकर, शशिकांत म्हादये ,यांचेकडून चॉकलेट्स सर्व विद्यार्थ्यांना देण्यात आली.क्रांती कुरतडकर यांचेकडून पहिलीतील मुलांना शैक्षणिक साहित्य देण्यात आले.
या वर्षीपासून जि.प.पूर्ण प्राथमिक मराठी शाळा मेर्वी शाळेत इयत्ता पहिलीचा वर्ग सेमी इंग्लिश सुरू करण्यात आला असून त्याचे फित कापून उद्घाटन माजी पोलीस पाटील श्री.सुरेश खरडे यांच्या हस्ते करण्यात आले .त्यानंतर या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.शर्वरी करगुटकर, उपशिक्षक श्री.चंद्रशेखर पेटकर, संजया पावसकर आदि शिक्षकवृंदांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले आणि नवीन शैक्षणिक वर्षांच्या शुभेच्छा दिल्या.
शेवटी उपशिक्षक श्री.चंद्रशेखर पेटकर यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता झाली.

फोटो = जि.प.पूर्ण प्राथमिक आदर्श मराठी शाळा मेर्वी शाळेतील पहिलीतील विद्यार्थ्यांना चक्क चार चाकी गाडीतून भव्य मिरवणूक, स्वागत करीत शाळेत आणण्यात आले.याप्रसंगी मुख्याध्यापिका सौ.शर्वरी करगुटकर, उपशिक्षक ,चंद्रशेखर पेटकर, अध्यक्ष मंगेश म्हादये ,हेमनाथ खरडे आणि मान्यवर
छाया = दिनेश पेटकर गावखडी