चिपळूण (वार्ताहर) : तालुक्यातील नवतरुण मित्र मंडळ, डिंगणकरवाडी बामणोली, ओम पोवारडेश्वर उत्कर्ष मंडळ (मुंबई) यांच्या
संयुक्त विद्यमानाने रानात वसलेल्या
शिवकालीन स्वयंभू श्री पोवारडेबाजी देवस्थान बामणोली येथे रविवार १५ रोजी महाशिवरात्री उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
महाशिवरात्री उत्सव सोहळ्यासाठी मंडळाच्या वतीने विविध कार्यक्रम साजरे होणार आहेत. यामध्ये
सकाळी ८ वा. मूर्तीचे विधिवत पूजन, सकाळी १० वा. – मूर्तीचे उद्यापन, सकाळी ११.३० वा. महाआरती व तीर्थप्रसाद, दुपारी
१२.३० वा. स्थानिक सुस्वर भजने, दुपारी. २ वा. मंदिराभोवती प्रदक्षिणा आणि दिंडी, सायंकाळी ५.३० वा. उत्तरार्ध आरती होईल. त्यानंतर कार्यक्रमाची सांगता होईल.
पोवारडेबाजी मंदिर हे गावापासून सुमारे ३ किलोमीटर अंतरावर जंगलात असल्याने हा कार्यक्रम सायंकाळी पूर्णत्वास जातो. सकाळी मात्र, या मंदिरात दर्शनासाठी भक्तांची रीघ लागते. डिंगणकरवाडीतील ग्रामस्थ या मंदिराचे व्यवस्थापन पाहतात. या महाशिवरात्री उत्सवाला सर्व भक्तांनी उपस्थित रहावे, असे आवाहन मंडळाने केले आहे.












