रत्नागिरी :शहरानजीकच्या किल्ला कुरणवाडी येथील प्रतिष्ठित नागरिक सुभाष दामोदर आंबुलकर यांचे शनिवार दिनांक १४ जून २०२५ रोजी रात्री ११.४५ वाजता दुःखद निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय ७८ वर्ष होते. नाना या नावाने ते सर्वांना परिचित होते. ते मनमिळावू व परोपकारी वृत्तीचे होते. मुरुगवाडा येथील भागोजीशेठ कीर स्मशानभूमीत त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व सून असा परिवार आहे. त्यांचा दशक्रिया विधी सोमवार २३ जून रोजी सकाळी ८.३० वाजता किल्ला येथे जुने मत्स्यालय जवळ तर बारावा विधी २५ जून रोजी त्यांच्या नाचणे येथील राहत्या घरी होणार आहे.












