रत्नागिरी | प्रतिनिधी : तरुण भारत संवाद रत्नागिरी आवृत्तीप्रमुख व पत्रकार सुकांत चक्रदेव तसेच नाट्य कलाकार मिलिंद चक्रदेव, हेमंत चक्रदेव यांचे वडील नरहर नारायण चक्रदेव यांचे रत्नागिरी तालुक्यातील कूर्धे -गणेशगुळे गावातील त्यांच्या राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. निधनासमयी त्यांचे वय ८५ होते. होते. १९७३ सालापासून सुरू केलेले कोकण प्रॉडक्ट, अन्नपूर्णा प्रॉडक्ट यासारखे शेती आधारित उद्योग आजमितीस सुरू होते. याशिवाय नारळ रोपवाटिका देखील त्यांनी कार्यान्वित केली होती.एक मनमिळावू आणि मेहनती व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची परिसरात ख्याती होती. त्यांच्या पश्चात तीन मुलगे ,२ सूना असा परिवार आहे.












