माखजन इंग्लिश मीडियम मध्ये जागतिक योगदिन साजरा

गौरव पोंक्षेl माखजन :     संगमेश्वर तालुक्यातील माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या माखजन इंग्लिश मिडीयम मध्ये जागतिक योग दिन साजरा करण्यात आला

या निमित्त विद्यालयातील विद्यार्थ्यांना शिक्षिका सौ माधवी लघाटे यांनी जागतिक योगा दिनाचे महत्व सांगितले. नियमित योगासने का करावीत याविषयी सखोल माहिती दिली.निरोगी जीवनासाठी योगासनांच महत्व समजावून सांगितले.आंतरराष्ट्रीय स्तरावर योगाभ्यासाचे महत्व काय हे विशद केले.यावेळी सौ माधवी लघाटे यांनी व सहकारी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना काही योगासने करून दाखवली व करून घेतली.यावेळी मुख्याध्यापिका धनश्री राजेसावंत भोसले व अन्य शिक्षक ,शिक्षिका विद्यार्थी उपस्थित होते.