अखिल मराठा फेडरेशनच्या अध्यक्षपदी जी.एस.परब यांची निवड

मसुरे | झुंजार पेडणेकर : मालवण तालुक्यातील कांदळगावचे सुपुत्र व परब मराठा समाज मुंबईचे सरचिटणीस श्री.जी.एस.परब यांची अखिल मराठा फेडरेशन च्या अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली. अखिल मराठा फेडरेशन च्या द्वैवार्षिक सर्वसाधारण सभेत ही निवड करण्यात आली.

मावळते अध्यक्ष श्री. सुरेश सुर्वे यांनी त्यांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या. सर्वांच्या सहकार्याने, मार्गदर्शनाने फेडरेशनचे काम यापुढेही आणखी उत्साहात पुढे नेले जाईल असे यावेळी जी एस परब म्हणाले. यावेळी मावळते सरचिटणीस सीए संतोष घाग, क्षत्रिय मराठा तावडे हितवर्धक मंडळाचे अध्यक्ष श्री.दिनकरराव तावडे,

निर्माण ग्रुप चे चेअरमन श्री.राजेद्र सावंत,

सावंतवाडी संस्थान मराठा समाजाचे अध्यक्ष श्री.इंद्रजीत सावंत,

मराठा बीझनेसमन फोरम चे अध्यक्ष श्री.अरुण पवार(माजी चीफ इनकम टॅक्स कमिशनर),

मुलुंड मराठा मंडळाचे कोषाध्यक्ष श्री.महेश चव्हाण तसेच अध्यक्ष श्री.रमेशराव शिर्के आदी मान्यवर उपस्थित होते. जी. एस. परब यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.