नामदार नितेश राणे यांचा वाढदिवस देवगड मध्ये विविध उपक्रमाने साजरा

*नामदार श्री. नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त मिठबावं जिल्हा परिषद विभागात रेनकोट वाटप*

नामदार श्री. नितेश राणे यांचा 23 जून रोजी वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने संपूर्ण विधानसभेत विविध सामाजिक उपक्रमातून वाढदिवस साजरा होत आहे. त्याचाच एक भाग म्हणून मिठबावं जिल्हा परिषद विभागात भाजपा जिल्हा सरचिटणीस श्री संदीप साटम यांच्या सहकार्याने आणि मिठबावं जिल्हा परिषद गट यांच्या वतीने वायरमन यांना मोफत रेनकोट वाटप करण्यात आले.यावेळी जिल्हा सरचिटणीस संदीप साटम, प्रकाश राणे, सावी लोके, भाई नरे, शैलेश लोके, सुनील पारकर, बांबूळकर सर, निशांत परुळेकर, महेश राणे, प्रवीण राणे, गणपत लोके, पुरुषोत्तम तेली

मोठ्या संख्येने ग्रामस्थ आणि वायरमन कर्मचारी उपस्थित होते

भाजपा जिल्हा सरचिटणीस श्री संदीप साटम यांच्या सहकार्याने आणि जिल्हा परिषद भाजपा शिरगाव गटाच्या वतीने स्लो सायकल स्पर्धेचे आयोजन.

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेशजी राणे साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिरगाव जिल्हा परिषद गटाने स्लो सायकल स्पर्धा लहान गट व खुला गट अशा दोन गटात घेण्यात आली.यात मोठ्या गटात 27 स्पर्धकांनी तर लहान गटात बारा स्पर्धकांनी सहभाग घेतला होता मोठ्या गटात प्रथम क्रमांक जशीथ साटम, द्वितीय क्रमांक पवन समीर चव्हाण तृतीय क्रमांक समर्थ मंगेश माने यांनी पटकावला तर लहान गटात प्रथम क्रमांक हार्दिक कृष्णा कदम द्वितीय क्रमांक गंधर्व सुनील तावडे तृतीय क्रमांक भक्ती तावडे यांनी पटकावला विजेत्यांना रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले सर्व सहभागी स्पर्धकांना भेटवस्तू देण्यात आल्या यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस श्री संदीप साटम, मिलिंद साटम, सुभाष नार्वेकर, युवक तालुका अध्यक्ष अमित साटम,मंगेश लोके, केशव साळसकर, शैलेश जाधव, राजू साटम, विनायक साटम, मंगेश माने, मंगेश पवार, युधिराज राणे, सुहास राणे, ओंकार तावडे, संध्या राणे, सुनील तावडे, विठोबा घाडी, ऋषिकेश आईर, यतीन पारधी, ओंकार साटम, सुधीर साटम, अश्मित देसाई, शीतल तावडे, इत्यादी पदाधिकारी, पालक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते स्पर्धेदरम्यान सर्वांना लाडू वाटून नामदार नितेश राणे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या..

महाराष्ट्र राज्याचे मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नामदार नितेशजी राणे साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून *देवगड ब्राह्मण देवमंदिर* येथे अभिषेक देवगड शहर भाजपच्या वतीने करण्यात आला.यावेळी

         भाजपा जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब खडपे,जिल्हा महिला उपाध्यक्षा सौ.प्रियांका साळसकर,महिला तालुकाध्यक्ष सौ. उषःकला केळुस्कर,नगरसेविका सौ प्रणाली माने,स्वीकृत नगरसेवक व्हीसी खडपकर, युवा मोर्चा शहर अध्यक्ष दयानंद पाटील ,नगरसेवक बुवा तारी संतोष तारी,शक्ती केंद्रप्रमुख बाळा गावकर,महिला शहराध्यक्ष तन्वी शिंदे,भाऊ पारकर,बापु जुवाटकर,ज्ञानेश्वर खवळे,अनिल कोरगावकर,मिलिंद माने,सिद्धेश माणगावकर,उल्हास मणचेकर,सिद्राम हिप्परकर, आदि उपस्थित होते

पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कुणकेश्वर चरणी भाजपा कार्यकर्त्यांच्या रुद्राभिषेक

 

देवगड (प्रतिनिधी)

 

महाराष्ट्र राज्याचे मत्स्यद्योग व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवस वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद गट कुणकेश्वर यांच्या वतीने कुणकेश्वर चरणी रुद्राभिषेक महाआरती तसेच कुणकेश्वर परिसरात सामाजिक उपक्रम राबवून वाढदिवस साजरा करण्यात आल्याची माहिती देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष एकनाथ दिली यांनी दिले.

देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष एकनाथ तेली सरपंच महेश ताम्हणकर,बबन चव्हाण, विजय वाळके, प्रल्हाद गावडे, राकेश वाळके, प्रमोद आंबेरकर, संजय वाळके,पुंडलिक नाणेरकर, दिग्विजय कोळंबकर, तुकाराम नानेरकर, उदय पेडणेकर, दिलीप चव्हाण,केदार ताम्हणकर आदी उपस्थित होते.