गौरव पोंक्षे l माखजन : संगमेश्वर तालुक्यात माखजन परिसरात भातलावणीला प्रारंभ झालेला पाहायला मिळत आहे.
मे महिन्यातच पावसाने सुरवात केल्याने पेरण्या रखडल्या होत्या.यामुळे साहजिकच भात लावंणीला विलंब झाला आहे.दरवर्षी आषाढी एकादशीला लावण्या पूर्णत्वास गेलेल्या पाहायला मिळतात.यावर्षी मात्र भात रोप तयार नसल्याने भातलावण्या उशिराने पूर्ण होण्याची चिन्हे आहेत.
सध्या सुरू झालेल्या भात लावण्या हळू हळू सुरू करण्याच्याच हेतूने चालू झालेल्या पाहायला मिळत आहेत.अजून रोपांची अपेक्षित वाढ झालेली नसल्याने भात लावण्यांचा वेगही मंदावलेला दिसत आहे.बहुतांश ठिकाणी पॉवर ट्रीलर च्या साहाय्याने चिखलणी करताना शेतकरी दिसत आहेत.दिवसेंदिवस कोकणातून शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या बैलजोड्यांच्या संख्येत लक्षणीय घट झालेली पहायला मिळत आहे.












