विद्यार्थ्यांनी यशाचा मार्ग निवडून आईवडिलांचे ऋण सार्थकी लावावे : तहसीलदार ओंकार ओतारी 

अणसूर येथे मंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव

वेंगुर्ले l प्रतिनिधी :विद्यार्थ्यांनी शिक्षणावर भर देऊन उत्तम यशाचा मार्ग निवडून आईवडिलांचे ऋण सार्थकी लावावे. गावातील मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी गुणगौरवा सारखे कार्यक्रम ग्रामपंचायत ने घेतले हे पण कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन तहसीलदार ओंकार ओतारी यांनी केले.

मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टी, अणसूर ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने गावातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी ते बोलत होते. मार्च २०२५ एसएससी मध्ये उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रमाचे उद्घाटन अणसूर पाल हायस्कुल मध्ये तहसीलदार ओंकार ओतारी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच सत्यविजय गावडे, उपसरपंच वैभवी मालवणकर, सदस्य सीमा गावडे, प्रज्ञा गावडे, सुधाकर गावडे, संयमी गावडे, भाजपाचे पदाधिकारी आनंद जयवंत गावडे, शाळेचे अध्यक्ष आत्माराम गावडे, सोसायटी चेअरमन कमलेश गावडे, पाल सरपंच कावेरी गावडे तसेच मंगेश गावडे, प्रकाश गावडे, प्रभाकर गावडे, बूथ अध्यक्ष वामन गावडे, सुनील गावडे, दीपक गावडे, सुनील बापू गावडे, शाळेचे मुख्यद्यापक राजेश घाटवळकर, सर्व शिक्षक, शिक्षिका, कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी आदी उपस्थित होते.

तहसीलदार ओंकार ओतारी यांचे स्वागत सरपंच सत्यविजय गावडे यांच्या हस्ते तर सत्कार आनंद जयवंत गावडे यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच भाजपाचे सर्व पदाधिकारी यांचे स्वागत सरपंच, उपसरपंच यांच्या हस्ते, ग्रा.प. सदस्य यांचे स्वागत भाजप किसान मोर्चा सदस्य आनंद गावडे यांच्या हस्ते करण्यात आले.

एसएससी उत्तीर्ण विद्यार्थी, प्रथम, द्वितीय, तृतीय, व यशवंतरावं भोसले कॉलेज मध्ये ८३.१८% गुण प्राप्त प्रथम क्रमांक कु, धनश्री कृष्णा गावडे यांना तहसीलदार यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, सन्मानपत्र सुपारीचे झाड देऊन गौवराविण्यात आले. तर अन्य उत्तीर्ण सर्व गुणवंत विदयार्थ्यांचा सरपंच, उपसरपंच सर्व सदस्य, भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या हस्ते सन्मानपत्र, सुपारीचे झाड देऊन गौरव करण्यात आला. पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विध्यार्थ्यांना फळे वाटप करण्यात आली. तसेच अणसूर पाल हायस्कुल च्या सर्व शिक्षकांचा दर वर्षी १००% निकाल आपल्या हायस्कुल चा लागतो म्हणून शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी सरपंच सत्यविजय गावडे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.ठाकर सर यांनी तर आभार घाटवळकर सर यांनी मानले.