न्यू इंग्लिश स्कूल उभादांडा विद्यालयाची स्नेहा हिंदीत तर राजलक्ष्मी इंग्रजी विषयात तालुक्यात प्रथम

वेंगुर्ले l प्रतिनिधी :वेंगुर्ला नगर वाचनालय वेंगुर्ला वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ नुकताच मोठ्या थाटात संपन्न झाला.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मराठी विभाग प्रमुख संत राऊळ महाराज कॉलेज कुडाळ शरयू असोलकर उपस्थित होत्या.

त्यांच्या हस्ते न्यू एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल उभा दांडा या प्रशालेतील इयत्ता दहावीत उज्ज्वल यश मिळणारी कु.राजलक्ष्मी नरेंद्र वराडकर हिने इंग्रजी विषयात तालुक्यात बाजी मारत तालुक्यात प्रथम येण्याचा बहुमान पटकावला,तर याच प्रशालेच्या कु.स्नेहा प्रकाश वेंगुर्लेकर हिने हिंदी या विषयात तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला या दोन्ही विद्यार्थीना म्हणून नगर वाचनालय, वेंगुर्ले यांच्या वतीने गौरविण्यात आले आणि रोख पारितोषिक देण्यात आले.

या गुणवंत विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयाचे मार्गदर्शन सौ.वर्षा मोहिते मॅडम केले तर हिंदी विषयासाठी प्रा.वैभव खानोलकर यांचे मार्गदर्शन लाभले.

हे यश संपादन करणाऱ्या राजलक्ष्मी वराडकर आणि स्नेहा वेंगुर्लेकर यांचे तसेच त्यांच्या पालकांचे, मार्गदर्शन करणारे शिक्षक सौ.मोहिते मॅडम आणि खानोलकर सर ,इतर सहकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मुख्याध्यापक श्री उमेश वाळवेकर यांचे संस्था चेअरमन श्री वीरेंद्र कामत आडारकर व्हाईस चेअरमन श्री रमेश पिंगुळकर संस्था सचिव श्री रमेश नरसुले खजिनदार सुजित चमनकर संस्था सभासद राधाकृष्ण मांजरेकर गोविंद मांजरेकर सुनील परब इतर सर्व सदस्य पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष राजाराम कोचरेकर, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष बाबी नवार

तसेच इतर सर्व सदस्य संस्था हितचिंतक यांनी तालुक्यात प्रथम येण्याचा बहुमान प्राप्त केल्याबद्दल दोन्ही विद्यार्थी आणि शिक्षक याचे विशेष अभिनंदन केले आहे