रत्नागिरी :
रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या सौ. गोदूताई जांभेकर विद्यालय, रत्नागिरी या प्रशालेत मार्च 2025 मध्ये एस.एस.सी परीक्षेत प्रविष्ट झालेल्या व उत्तम यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ व सत्कार सोहळा बुधवार दिनांक 25 /6 /2025 रोजी आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेच्या प्र. मुख्याध्यापिका संजना तारी उपस्थित होत्या तर प्रमुख अतिथी डोंबिवली स्थित उद्योजक माननीय प्रशांत भावे व सन्माननीय विशाखा भावे तसेच मालतीबाई जोशी प्राथमिक विद्यालयाचे प्र. मुख्याध्यापक पांचाळ सर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वतीच्या प्रतिमेला वंदन करून दीपप्रज्वलनाने झाली. तसेच प्रमुख अतिथी यांचे स्वागत प्रशालेच्या प्र. मुख्याध्यापिका संजना तारी यांनी पुष्पगुच्छ देऊन केला.
यावेळी इयत्ता दहावी मधील प्रथम तीन क्रमांक पटकावलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये प्रथम क्रमांक कुमारी सिद्धी प्रकाश मडके (92.20 %) द्वितीय क्रमांक कुमारी स्वरा संतोष शिवनेकर(. 90.40 ) तृतीय क्रमांक कुमारी श्रद्धा राजेंद्र धुर्वे (85.60% ) तसेच विविध विषयात प्रथम आलेल्या व उल्लेखनीय कार्य केलेल्या विद्यार्थ्यांचाही बक्षीस देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. यामध्ये तन्वी बारगोडे, मनिता मोहकर, दिशा राठोड, गौरेश नांदगावकर , रिद्धी ठीक, मंजिरी सावंत, सिद्धी बारगोडे, अविनाश गुरव, सेजल जाधव यांचा समावेश होता.
प्रशालेत दरवर्षी इयत्ता नववीतून दहावीत जाणारी एका होतकरू, सालस , सर्व कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या आदर्श विद्यार्थीनी मानाचा सगुणा पुरस्कार शैक्षणिक वर्ष 2025/ 26 साठी कुमारी सिद्धी बारगोडे हिला देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्रशालेच्या प्र. मुख्याध्यापिका संजना तारी यांनी प्रशालेच्या प्रगतीचा आढावा घेतला व यावर्षी प्रशालेचा निकाल 92.13% लागल्याबद्दल सर्व शिक्षक व गुणवंत विद्यार्थी यांचे अभिनंदन केले.
कार्यक्रमाला प्रशालेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गुणगौरव कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश कांबळे यांनी केले तर उपस्थितांचे आभार धनाजी वाघमोडे यांनी मानले.












