लोटेतील अपघातप्रकरणी जेसीबी चालकावर गुन्हा

crime
खेड (प्रतिनिधी) मुंबई-गोवा महामार्गावरील लोटेजवळील पुलाजवळ स्वतःच्या गंभीर दुखापतीसह जेसीबीचे नुकसान केल्याप्रकरणी जेसीबी चालक प्रकाश भिमाप्पा लमानी (३२, रा. बासवान-बागेवाडी, कर्नाटक) याच्यावर बुधवारी सायंकाळी उशिरा येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
या बाबत सुबोध सखाराम चाळके (३३, पीरलोटे-दत्तवाडी) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली, जेसीबी चालक प्रकाश लमानी हा जेसीबी (एमएच ०८/एएक्स ०४९९) घेवून जात होता. त्याचे नियंत्रण सुटल्याने जेसीबी रस्त्यालगतच्या कठड्यावर आदळत अपघात केला. अपघातात जेसीबीचे नुकसान केल्याचा ठपका चालकावर ठेवण्यात आला आहे.