रत्नागिरी :
“द वीक – हंसा रिसर्च बेस्ट कॉलेज सर्वे २०२५” च्या सर्वेक्षणात फिनोलेक्स अॅकॅडमी ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी, रत्नागिरी या अभियांत्रिकी महाविद्यालयाने मुंबई विद्यापीठामध्ये ६वे स्थान, महाराष्ट्रातील उत्कृष्ट खाजगी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या क्रमवारीत २१वे स्थान, खाजगी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या क्रमवारीत भारताच्या पश्चिम विभागात २८वे स्थान, उत्कृष्ट खाजगी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या क्रमवारीत राष्ट्रीय पातळीवर १७६ वे स्थान, उत्कृष्ट सरकारी व खाजगी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या क्रमवारीत राष्ट्रीय पातळीवर २०५ वे स्थान पटकावले आहे.
“द वीक” दरवर्षी देशभरातील अभियांत्रिकी महाविद्यालयांचे मूल्यांकन करण्यासाठी सर्वेक्षण करते. या सर्वेक्षणाच्या आधारावर अभियांत्रिकी महाविद्यालयाचा दर्जा ठरवला जातो. त्यासाठी यावर्षी देशभरातील विविध अभियांत्रिकी महाविद्यालयातून निवडक महाविद्यालयांचे सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात मुख्यःत्वे महाविद्यालयाची मुलभूत माहिती, पायाभूत सुविधा, बौद्धिक संसाधने, प्रशिक्षित शिक्षकवर्ग, शैक्षणिक कार्यक्रम आणि प्रक्रिया, विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता आणि प्रशासन, नोकरीतील संधी, औद्योगिक क्षेत्राशी महाविद्यालयाचा संपर्क आणि संशोधन अभिमुखता या गोष्टीचा विचार करण्यात आला.
या यशाबद्दल फिनोलेक्स अॅकॅडमीच्या अध्यक्षा श्रीमती अरुणा कटारा, मॅनेजिंग ट्रस्टी अमृता कटारा व प्राचार्य डॉ. कौशल प्रसाद यांनी सर्व प्राध्यापक व कर्मचारीवर्ग यांचे अभिनंदन केले.













