खेड(प्रतिनिधी) कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या सीएसएमटी मुंबई-मडगाव वंदे भारत एक्सप्रेसच्या फेऱ्यांना प्रवाशांची सर्वाधिक पसंती मिळत आहे. सद्यस्थितीतील एक्सप्रेसचे ८ डबे प्रवाशांसाठी अपुरे पडत आहेत. प्रवाशांची वाढीव डब्यांची मोठी मागणी असतानाही अजूनही रेल्वे बोर्ड उदासीन आहे. प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेत एक्सप्रेस १६ किंवा २० डब्यांची चालवावी, असे विनंती कोकण विकास समिती अध्यक्ष जयवंत दरेकर यांनी रेल्वे बोर्डाला केली आहे.
आलिशान वंदे भारत एक्सप्रेस कोकण मार्गावर सुरू झाल्यापासून सर्वच फेऱ्यांना प्रवाशांचा भर भरून प्रतिसाद लाभत आहे. सद्यस्थितीतील एक्सप्रेस ८ डब्यांची धावत आहे. ८ डबे अपुरे पडत असल्याने एक्सप्रेस १६ किंवा २० डब्यांची चालवण्यासाठी
यापूर्वीपासूनच आग्रह धरण्यात आला आहे. मात्र तरीही रेल्वेबोडनि सकारात्मक निर्णय घेण्यास असमर्थतता दर्शवली आहे.
मुंबईत पिट लाईन आणि देखभाल स्लॉटचा वापर मुंबई-मडगाव वंदे भारत एक्सप्रेसला झाल्यास ती १६ किंवा २० डब्यांची चालवणे शक्य होणार आहे. कोकण मार्गावरून धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसने ९५ टक्के प्रवासी क्षमतेची परंपरा कायम राखली आहे. सद्यस्थितीत धावणारी ८ डब्यांची वंदे भारत एक्सप्रेस गैरसोयीची ठरत आहे. यामुळे एक्सप्रेस १६ किंवा २० डब्यांची चालवण्याच्या दृष्टीने सकारात्मक निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली आहे.












