जिल्हा परिषद शाळा आरे देवरहाटी येथे कविता गायन व कथाकथन कार्यक्रम

गुहागर प्रतिनिधी:
जिल्हा परिषद शाळा आरे देवराठी येथे कविता गायन व कथाकथन कार्यक्रम अत्यंत उत्साह पूर्ण संपन्न झाला. विद्यार्थ्यांचा भाषिक विकास व्हावा, मराठी विषयाबाबत आवड वृद्धिंगत व्हावी तसेच त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा म्हणून सदरच्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले .त्यावेळी गुहागरचे केंद्रप्रमुख डॉ मनोज पाटील ,मुख्याध्यापक मथुवेल गावित व सर्व विद्यार्थी उपस्थित होते. सदरच्या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग दर्शविला. कविता गायन कार्यक्रम मध्ये अर्णव अंकुश पाष्टे प्रथम ,शिवण्या संदेश घाणेकर द्वितीय ,आरोही नितीन माने तृतीय व सिद्धी संतोष किजविले उत्तेजनार्थ क्रमांक पटकावला .तसेच कथाकथन कार्यक्रमांमध्ये आर्यन नरेश रसाळ, विराज समीर पारदळे ,आर्या नरेश रसाळ यांनी सुयश प्राप्त केले. विजेत्या सर्व विद्यार्थ्यांना केंद्रप्रमुख डॉ मनोज पाटील व मुख्याध्यापक मथुवेल गावित यांचे शुभहस्ते पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले .