उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याचा उद्दामपणा
कामगारांचे कामबंद आंदोलन माफीनाम्यानंतर मागे
रत्नागिरी : रत्नागिरी पालिकेच्या सफाई कामगाराला बुधवारी सकाळी मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याकडून ही मारहाण झाली. या घटनेनंतर संतापलेल्या सफाई कर्मचार्यांनी काम बंद आंदोलन पुकारले. मात्र उबाठ्याच्या कार्यकर्त्यांने लेखी माफीनामा दिल्यानंतर प्रकरण निवळले आणि कर्मचारी पुन्हा कामावर रुजू झाले.
फोन न उचलण्यावरून राजिवडा येथे हा मारहाणीचा प्रकार घडला. पालिकेच्या सफाई कामगारांचे मुकादम मनोहर कदम राजिवडा येथे सफाई कामासाठी गेले असता तेथील उबाठाचे कार्यकर्ते साजिद पावसकर हे त्यांना फोन करत होते. पंरतु त्यांनी फोन उचलले नाही, यामुळे पावसकर संतापले. कदम राजीवडा येथे गेल्यानंत कदम आणि पावसकर यांच्यामध्ये जोरदार शाब्दीक चकमक उडाली. याचे पर्यवसान हाणामारीत झाले. साजित पावसकर याने कदम यांना मारहाण केली. शासकीय काम करत असताना मारहाण केल्यामुळे पालिकेच्या कर्मचारी संघटनेने एकत्र येऊन कामबंद आंदोलन पुकराले. सर्व कर्मचारी वर्ग पालिकेत एकत्र आला . घडलेल्या घटनेचे तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.
पावसकर यांच्या नेहमीच्या अशा वागण्यामुळे कर्मचाऱ्यांना त्रास होतो यांमुळे प्रचंड संताप होता. यावेळी उबाठाचे शहर प्रमुख प्रशांत साळुंखे आणि मुख्याधिकारी वैभव गारवे यांनी कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींशी बोलून गुन्हा दाखल न करता काहीतरी तोडगा काढा, अशी विनंती साळुंखे यांनी केली. साळुंखे, साजित पावसकर हे मुख्याधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये होते. अखेर पोलिस ठाण्याचे हेलपाटे मारण्यापेक्षा पावसकर यांनी लखी माफिनामा द्यावा, अशी मागणी सफाई कर्मचाऱ्यांनी केली.
त्यानंतर साळुंखे यांनी समजावून सांगितल्यानंतर लेखी माफिनामा दिला. तसेच सर्व कर्मचाऱ्यांसमोर साजित पावसकर यांनी मनोहर कदम यांची जाहीर माफी मागितली.
नगर पालिकेत पावसकर आणि स्वच्छता कर्मचारी समोरासमोर आले तेव्हा कर्मचाऱ्यांनी त्यांना खडे बोल सुनावले












