सिंधुदुर्ग पतसंस्था फेडरेशन अध्यक्षपदी निवडीबद्दल सुनील राऊळ यांचे आ. दीपक केसरकरांकडून अभिनंदन

सावंतवाडी । प्रतिनिधी : सैनिक पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील राऊळ यांची सिंधुदुर्ग जिल्हा पतसंस्था फेडरेशनच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल माजी शालेय शिक्षण मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी

त्यांचे हार्दिक अभिनंदन केले. राऊळ यांच्या निवडीमुळे जिल्ह्यातील सहकार क्षेत्राला अधिक बळकटी मिळेल, असा विश्वास केसरकर यांनी व्यक्त केला.

या अभिनंदन प्रसंगी माजी सभापती रवींद्र मडगावकर, माजी सभापती अशोक दळवी, माजी सभापती मोहन सावंत, शशिकांत गावडे, प्रताप परब आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना आमदार केसरकर यांनी सुनील राऊळ यांच्या कार्याची प्रशंसा केली आणि त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. राऊळ यांच्या नेतृत्वाखाली पतसंस्था फेडरेशन जिल्ह्यातील पतसंस्थांच्या हितासाठी आणि विकासासाठी अधिक प्रभावीपणे कार्य करेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

सुनील राऊळ यांनी जिल्हा पतसंस्था फेडरेशनच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्याने जिल्ह्यातील पतसंस्थांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि त्यांच्या प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण योगदान देण्याची संधी मिळेल, अशी भावना व्यक्त करीत या निवडीमुळे जिल्ह्यातील सहकार चळवळीला नवसंजीवनी मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.