वायंगणी स्वामी समर्थ मठात १०जुलै रोजी गुरुपौर्णिमा उत्सव 

आचरा–अर्जुन बापर्डेकर :श्री स्वामी समर्थ मठ वायंगणी येथे गुरुवार 10 जुलै रोजी गुरुपौर्णिमा उत्सव साजरा केला जाणार आहे . यानिमित्त स्वामी समर्थ सेवा मंडळातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.पहाटे पाच वाजता मंगल स्नान दुग्धाभिषेक व पूजा विधि, सकाळी सात वाजता नित्य आरती, सकाळी आठ ते दहा दरम्याने अभिषेक पारायण ,

10 वाजल्यानंतर धार्मिक विधी दुपारी महाआरती त्यानंतर महाप्रसाद सायंकाळी नित्य आरती रात्री नऊ वाजता स्थानिकांची भजने तरी या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घेण्याचे आवाहन श्री स्वामी समर्थ मठ वायंगणी तर्फे करण्यात आले आहे .