साकवापर्यंत जाणाऱ्या रस्त्याची शासकिय दप्तरी नोंदच नाही
मनसे उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
गुहागर l प्रतिनिधी :गुहागर तालुक्यातील जानवळे ओझरवाडी येथे नव्याने बांधण्यात आलेल्या साकव सध्या वादात अडकला आहे.या सकवाचा सर्वसामान्य जनतेला होणार का?असा सवाल मनसे उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केला आहे.मुख्य म्हणजे सदर साकवाकडे जाणाऱ्या रस्त्याची नोंद शासकीय दप्तरी कोठेही दिसत नसल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.
मनसे उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर यांनी दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की,
गुहागर तालुक्यातील जानवळे गावातील ओझरवाडी येथे साकव बांधण्यात आला आहे. या साकवाचा फायदा गावातील पुढील वाडीतील ग्रामस्थांना होणार आहे का..? याची चौकशी करण्यात यावी.तसेच साकवापर्यंत जाणा-या रस्त्याची किंवा पायवाटेची कुठेही शासकीय दप्तरी २३ नंबरला नोंद नाही. ग्रा.पं. जानवळे यांनी कुठल्याही मागणीचे पत्र किंवा प्रस्ताव पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद कार्यालयाकडे सादर करण्यात आलेला नाही.परंतु या साकवापलीकडे लोकवस्ती आहे परंतु तेथील पुढील रस्ता बंद आहे तरी यांची आपल्या कार्यालय कडून योग्य ती चौकशी करण्यात यावी.
मुख्य रस्ता जानवळे हेमंत हॉटेल ते साईबाबा मंदिर मार्ग शेजारी ओझरवाडी येथे जाण्या-येण्यासाठी व वाहतुकीसाठी साकव पलीकडून कुठपर्यंत जाणार आहे. या साकवाचा सर्वसामान्य जनतेला उपयोग होणार आहे का..?
महसूल विभागामार्फत जो गट नंबर २४८ बिनशेती करण्यात येतो, त्याच्या जागेमधून वाट देणे बंधनकारक असते तरी सदर लाभार्थी इतर लोकांना जागा देत नाही, नवीन शासन निर्णयाप्रमाणे पुढील घरासाठी किंवा वाडीतील लोकांसाठी जागा देणे बंधनकारक असताना पण त्यांना पायवाट/ जागा दिली जात नाही.वरिल विषयांची चौकशी करण्यात येऊन आपल्या लेखी अभिप्राय कळविण्याची मागणी विनोद जानवळकर यांनी या निवेदनाद्वारे व्यक्त केली आहे.यावर योग्य ती कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारादेखील त्यांनी दिला आहे.













