न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाटच्या कु.मनस्याची राज्यस्तरीय कॅम्पसाठी निवड
न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाटच्या शिरपेचात मानाचा तुरा
फोंडाघाट. | कुमार नाडकर्णी — न्यू इंग्लिश स्कूल ॲण्ड ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स, व्होकेशनल अॅण्ड सायन्स ची इयत्ता०९वी मधील कु.मनस्या निलेश फाले या विद्यार्थिनीची अमरावती येथे होणाऱ्या राज्यस्तरीय ऑल इंडिया थल सैनिक कॅम्प (सर्विस शूटिंग) साठी निवड झाली आहे.फोंडाघाट सारख्या ग्रामीण भागातून राज्यस्तरीय स्पर्धेपर्यंतचा कु.मनस्याचा प्रवास निश्चितच खडतर होता.सर्वप्रथम ५८ महाराष्ट्र बटालियन एन.सी.सी सिंधुदुर्ग यांच्या वतीने जून महिन्याच्या प्रारंभी घेण्यात आलेल्या सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सांगली, सातारा आणि कोल्हापूर या पाच जिल्ह्याच्या इंटर ग्रुप स्पोर्ट शुटींग स्पर्धेमधून राज्यस्तरासाठी सुमारे १२० कॅडेट्समधून निवड झालेल्या २० कॅडेटस् पैकी कु.मनस्या ही एक होती.त्यानंतर अमरावती येथे होणाऱ्या ऑल इंडिया थल सैनिक कॅम्प (सर्विस शूटींग) स्पर्धेसाठी कु.मनस्याने आपल्या जिद्दीने आणि कठोर मेहनतीने बाजी मारत आपले स्थान निश्चित केले आहे.
कु.मनस्या हिला ५८ महाराष्ट्र बटालियन एनसीसी सिंधुदुर्गचे सी.ओ. दीपक दयाल शर्मा, ए.ओ. तनुज मंडलिक, नायब सुभेदार धीरज कुमार , हवालदार भटकर सर, न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाटचे एनसीसी ऑफिसर सौ.आर्या ए.भोगले, श्री.एम.डी.लाड.व श्री.ए.व्ही.पोफळे यांचे मार्गदर्शन लाभले.
या उत्तुंग यशासाठी फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन, मा.श्री.म.ज.सावंत, सेक्रेटरी मा.श्री.चं.शा.लिंग्रस, खजिनदार मा.श्री.वि.रा.तायशेटे, शाळा समिती चेअरमन मा.श्री.द.दि.पवार, मा.संचालक फोंडाघाट एज्युकेशन सोसायटी, प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.पी.के.पारकर, सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी हार्दिक अभिनंदन करून पुढे होणाऱ्या राज्यस्तरीय शूटींग स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. मात्र कोणतीही पार्श्वभूमी नसलेल्या आणि गरिबीतून अथक प्रयत्नाने यश मिळवलेल्या मनस्याच्या या यशाचे सर्व फोंडाघाट पंचक्रोशीत कौतुक होत आहे. यामुळे कणकवली तालुका आणि जिल्ह्याचे नाव राज्यस्तरावर पोहोचविले आहे.












