केवायसीसह बँकेच्या नियमांच्या अंमलबजावणीबाबत अधिक सतर्कता बाळगावी- अमित रेठरेकर

राजापूर l प्रतिनिधी : आपल्या ग्राहकांना अधिक चांगली सेवा देताना बँक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ग्राहकांची बँक केवायसी, ग्राहकाची सुरिक्षतता तसेच बनावट नोटा ओळखणे व बँकेच्या नियमांच्या काटेकोर अंमलबजावणीबाबत सतर्क असले पाहिजे असे प्रतिपादन दि. कराड अर्बन असिस्टंट जनरल मॅनेजर अमित रेठरेकर यांनी येथे केले.

राजापूर अर्बन बँकेच्या वतीने रविवारी आयोजित करण्यात आलेल्या बँक कर्मचारी प्रशिक्षण शिबीरात ते बोलत होते. शहरातील नवाळे कॉम्पलेक्सच्या ‘मातोश्री’ सभागृह सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या शिबीरप्रसंगी व्यासपीठावर बँकचे अध्यक्ष हनिफ मुसा काझी, बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे अध्यक्ष अनिलकुमार करंगुटकर, संचालक जयंत अभ्यंकर, संजय ओगले, प्रकाश कातकर, किशोर जाधव, विवेक गादीकर, दिनानाथ कोळवणकर, सौ. प्रतिभा रेडीज, बी.ओ.एम. सदस्य श्री. प्रकाश भावे आदी मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी दि. कराड अर्बन बँकेचे असिस्टंट जनरल मॅनेजर अमित रेठरेकर यांनी (के. वाय. सी. आणि ए. एम. एल. सेल) त्या अनुषंगाने ए. एम. एल. कॅटेगरायझेशन आणि रिपोर्टींग व फेक नोट अॅडेन्टीफिकेशन अॅण्ड रिपोर्टींग या विषयांवर विस्तृत मार्गदर्शन केले. तर कराडचे प्रा. महावीर साळवी कस्टमर ग्रीव्हीयन्स, कस्टमर सर्व्हिस, स्टाफ बिहेव्हीअर, स्टाफ अकांऊंटॅबिलिटी या विषयांवर मार्गदर्शन केले.

अर्बन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखरकुमार अहिरे यांनी अंतर्गत हिशेब तपासणी, रिझर्व्ह बँक इन्स्पेक्शन, कंम्प्लायन्स, क्लोझर रिपोर्टींग या विषयावर मार्गदर्शन केले. तर संचालक दिनानाथ कोळवणकर यांनी संचालक मंडळ, कर्मचारी आणि ग्राहक सेवा या अनुषंगाने घ्यावयाच्या दक्षता आणि कार्यवाही याबाबत मार्गदर्शन केले.

आपल्या अध्यक्षीय भाषणात अध्यक्ष हनिफ काझी यांनी अशा

प्रशिक्षणाची गरज, हेतू, व्यावसाईकतेतील नैपुण्य याबाबत आपले मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन बँकेचे लेखापाल रमेश काळे यांनी केले.

फोटो 12 आरजेपी 2।3

राजापूर अर्बन बँकेच्या कर्मचारी प्रशिक्षण शिबीरात बोलताना असिस्टंट जनरल मॅनेजर अमित रेठरेकर तर दुसऱ्या छायाचित्रात प्रशिक्षणाला उपस्थित अधिकारी व कर्मचारी .