लांजा (प्रतिनिधी) लांजा तालुक्यातील शिपोशी गावचे सुपुत्र आणि प्राथमिक शिक्षक असलेल्या प्रसिद्ध लेखक दीपक नागवेकर यांच्या मोरपंखी या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा किल्ले रायगडावर संपन्न झाला.
हा प्रकाशन सोहळा सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या तेराव्या वंशज डॉ.शीतल मालुसरे,साहित्यिक अवि जंगम,साहित्यिक सुभाष लाड,इतिहास अभ्यासक सुनील कदम,विजय हटकर,रमेश काटकर,गणेश चव्हाण,महेंद्र साळवी,प्रकाश हर्चेकर,मंगेश चव्हाण, विराज चव्हाण यांचे उपस्थितीत संपन्न झाला.
दीपक नागवेकर हे प्राथमिक शिक्षक असून एक लेखक म्हणून त्यांची ओळख आहे. आपल्या पुस्तकाचे प्रकाशन हे स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावर व्हावा अशी त्यांची इच्छा होती. त्यानुसार हा प्रकाशन सोहळा संपन्न झाला
जागतिक वारसा स्थळांमध्ये राजधानी किल्ले रायगडचा समावेश झाल्यानंतर या शिवभूमीत प्रसिद्ध होणारे मोरपंखी हे पहिले पुस्तक ठरले आहे. या बद्दल दीपक नागवेकर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.













