लांजा (प्रतिनिधी) तालुक्याच्या पुर्व भागातील विद्यार्थ्यांना उत्तम ज्ञानार्जन करण्यासाठी सर्वोत्तम शिक्षण देणाऱ्या भांबेड पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे कार्य कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन लांजा तहसीलदार प्रियांका ढोले यांनी भांबेड येथे केले.
भांबेड पंचक्रोशी शिक्षण संस्था भांबेड संचालित प्रतापराव माने विद्यालय आणि सुमित्रा देसाई कनिष्ठ महाविद्यालय भांबेड मधील इ. १० वी सेमी व मराठी, १२ वी कला व वाणिज्य तसेच एन. एम. एम. एस. शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी गुणगौरव समारंभ नुकताच संपन्न झाला. यावेळी तहसीलदार प्रियांका ढोले बोलत होत्या.यावेळी संस्था अध्यक्ष ॲड. सदानंद गांगण, सचिव संदीप जाधव, शाळा समिती अध्यक्ष गोपीनाथ पवार, संचालक बळीराम धडम, रवींद्र गांगण, तुळशीराम मोरे, दत्ताराम धनावडे, प्रशांत गुरव, अनंत गुरव, मुख्याध्यापक इलाही मुलाणी, हीरक महोत्सव समिती अध्यक्ष प्रा. जयराज मांडवकर, माजी विद्यार्थी संघटना, भांबेड अध्यक्ष धनंजय गांधी, नवयुग उत्कर्ष युवक मंडळ, भांबेड चे अध्यक्ष भालचंद्र लाड, ग्रा. पं. सदस्य राजेंद्र गांधी, पोलिस पाटील वसंत शिवगण, माजी शिक्षक काशिराम चव्हाण, सूर्यकांत गुरव, शिवाजी जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संजय पाटील व आभार प्रा. जयराज मांडवकर यांनी केले. यावेळी इ. १० सेमी इंग्रजी अलिना जेठी, सार्थक गांधी, तनुष्का चव्हाण, इ. १० मराठी माध्यम राज गोसावी, आदर्श दैत, दीक्षा शिवगण, १२ वी कला प्रबुद्ध कांबळे, धनेश शिवगण, सर्वेश पांचाळ, १२ वी वाणिज्य प्रथमेश गुरव, सिद्धी भातडे, शुभम धावडे आठवी एन. एम. एम. एस. शिष्यवृत्ती करण शिवगण, आर्यन गुरव, हर्ष भालेकर, सिद्धी झोरे, श्रावणी गुरव, दिप्ती जाधव, वरद मांजरे, जिनद वणू , ५ वी शिष्यवृत्ती मानस कोकरे यांचा रोख रक्कम देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्था संचालक, मुख्याध्यापक, सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली.









