संगमेश्वर तालुक्यात मुसळधार पाऊस; संगमेश्वर रामपेठेत पूराचे पाणी शिरले; व्यापाऱ्यांची उडाली तारांबळ

*निलेश जाधव / देवरूख* 

संगमेश्वर तालुक्यात कालपापासून जोरदार पाऊस बरसायला सुरूवात

 

आज मंगळवारीही पावसाचा जोर कायम आहे

 

संगमेश्वर रामपेठेत पूराचे पाणी शिरले असून व्यापाऱ्यांची धावपळ उडाली आहे.

 

देवरूख-संगमेश्वर मार्गावरील तेऱ्ये गेल्येवाडी येथे रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूक काहीकाळ बंद होती

 

देवरूख-मार्लेश्वर मार्गावरील निवेखुर्द येथील निंबेरा पूलाजवळ रस्त्यावर झाड पडले; सार्वजनिक बांधकाम विभागाने हे झाड तोडून बाजूला केले