रत्नागिरी, ता. 16 ः शहरातील प्रतितयश कुसूमताई सहकारी पतसंस्थेचा ठेव वृद्धीमास 1 जुलैपासून सुरु झाला असून 10 दिवसांमध्ये दिड कोटी रुपयांच्या ठेवी जमा झालेल्या आहेत. ग्राहकांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असून ठेवींसाठीची मुदत 1 ऑगस्टपर्यंत सुरु राहणार आहे.
या कालावधित ठेवीदारांना आकर्षक व्याजदर व ठेव योजना जाहीर केल्या आहेत. सर्व ठेवीदारांसाठी सर्वाधिक ९ टक्के व्याजदर असून सहा महिन्यासाठी ६ टक्के व्याजदर, ३ वर्ष मासिक गुंतवणुकीवर (त्रैमासिक व्याज / वार्षिक व्याज) व्याजादर ८ टक्के, तसेच ३ वर्ष पुनर्गुतवणुकीवर ७.७५ टक्के व्याज ठेवीदारांसाठी ठेवण्यात आले आहे.
याचा लाभ घेऊन सभासदांसह नवीन ग्राहकांनी मोठ्याप्रमाणावर गुंतवणूक करावी, असे आवाहन अध्यक्ष प्रा. दत्तात्रय उर्फ नाना शिंदे आणि उपाध्यक्ष सतीश शेवडे यांनी केले आहे. कुसुमताई पतसंस्थेने अल्पावधीतच ग्राहकांमध्ये नाव मिळवले आहे. ग्राहकांसाठी चांगल्या सुविधा पंतसंस्थेकडून देण्यात आलेल्या आहेत. 1 जुलैपासून पंतसंस्थेचा ठेववृध्दी मास सुरु होत आहे. कुसुमताई सहकारी पतसंस्थेने जुलै ते ऑगस्ट २०२५ असा ठेव वृढी मास जाहीर केला असून पतसंस्थेने यापूर्वी जाहीर केलेल्या ठेववृद्धी मासाला ठेवीदारांनी भरभरून प्रतिसाद दिलेला आहे. या विश्वासावर या वर्ष अखेरीस ५० कोटीचा टप्पा पार करण्याचे उद्दिष्ट संचालक मंडळाने निश्चित केले आहे.
पतसंस्थेचे भागभांडवल ६९ लाख २० हजार असून ठेवी ४१ कोटी ६७ लाख, कर्ज ३३ कोटी ९८ लाख तर नफा ५० लाख ४५ हजार रूपये, सीडी रेशो ७२.२९ टक्के तर वसुली ९७ टक्के आहे. यंदा जाहिर केलेल्या योजनेला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून दहा दिवसात दिड कोटीच्या ठेवी जमा झालेल्या आहेत. सध्या सोनेतारण कर्जाबरोबर जामिनतारण कर्जाला मागणी वाढत आहे. विजबिल भरणा केंद्र सर्व शाखांमध्ये सुरु असून त्याचाही फायदा ग्राहकांना व नागरिकांना मिळत आहे. आपल्या ठेवी पतसंस्थेमध्ये गुंतवून आकर्षक व्याजदराचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे उपाध्यक्ष शेवडे यांनी केले आहे. दरम्यान, पतसंस्थेच्या एकुण सहा शाखा आहेत. त्यामध्ये रत्नागिरी शहरातील गाडीतळ येथील मुख्य कार्यालय, जाकादेवी बाजारपेठ, खंडाळा बाजारपेठ, खेडशी गयाळवाडी फाटा, पावस बाजारपेठ आणि शुंगारतळी बसस्टॅण्ड येथील शाखांमध्ये ठेवी जमा झाल्या आहेत.












