राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे स्वयंसेवकांचे स्वागत उपक्रम

असामान्य नेतृत्वाची संधी – श्रेयस रसाळ

​भारतीय समाज व्यवस्था लक्षात घेता निर्माण होणारे सामाजिक प्रश्न सोडविण्यासाठी आपणच तयार व्हायला हवे. यासाठी स्वत:मधील नेतृत्व गुण विकसित करा आणि अशी संधी राष्ट्रीय सेवा योजना विभागात उपलब्ध आहे असे मार्गदर्शन श्री. श्रेयस रसाळ यांनी राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे स्वयंसेवकांचे स्वागत उपक्रमात केले.
​राष्ट्रीय सेवा योजना विभागात नव्याने नोंदणी होणाऱ्या स्वयं सेवकांसाठी स्वागत उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या प्रेरणा गीताने झाली. त्या नंतर कार्यक्रमाधिकारी प्रा. सचिन सनगरे यांनी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे महत्व व संधी या बद्दल मार्गदर्शन केले. मागील वर्षी विविध शिबिरात सहभागी झालेल्या स्वयंसेवकांनी आपली मनोगते व्यक्त केली. त्यानंतर श्रेयस रसाळ यांनी आपले अनुभव कथन केले. स्वयंसेवकांचे परस्पर ओळख, नोंदणी अर्ज भरून घेणे व विविध उपक्रमासाठी निवड करण्यात आली. अल्पोपहार देऊन उपक्रमाची सागता करण्यात आली.
​यासाठी कार्यक्रमाधिकारी प्रा. हर्षदा पटवर्धन, प्रा. उमा जोशी. प्रा. सचिन सनगरे यांनी नियोजन केले. गौरांग नामजोशी याने स्वयंसेवकांचे आभार व्यक्त केले व त्या नंतर स्वयंसेवकांचे स्वागत कार्यक्रमाची सांगता झाली.