देवगड (प्रतिनिधी)महाराष्ट्र कर्नाटक मधील जैन समाजाची गेली १२६ वर्षे,अव्याहतपणे सामाजिक शैक्षणिक ,धार्मिक क्षेत्रात संस्कार ,शिक्षण व आरोग्य क्षेत्रात कार्यरत असलेल्या दक्षिण भारत जैन सभा या संस्थेच्या वतीने प्रतिष्ठेचा श्री जी के पाटील “आदर्श पत्रकारिता पुरस्कार”सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड येथील दयानंद यशवंत मांगले याना जाहीर करण्यात आला आहे.”पुरस्कार प्रदान सोहळा दि .२१ जुलै रोजी श्री आदिनाथ समुदाय भवन अथणी गोकाक मेनरोड हारुगेरी ता.रायबाग जि. बेळगावी या ठिकाणी अध्यक्ष भालचंद्र विरेंद्र पाटील (अध्यक्ष दक्षिण भारत जैन सभा)यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख पाहुणे,नाम.सतीश एल जारकीहोळी (सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री बेळगावी),नाम.डी. सुधाकर (नियोजन आणि सांख्यिकी मंत्री कर्नाटक राज्य), यांच्या प्रमुख उपस्थितीत माजी खासदार डॉ प्रभाकर कोरे,(चेअरमन केई एल सोसायटी बेळगावी),यांच्या हस्ते दीप्रज्वलन माजी उपमुख्यमंत्री आम.लक्ष्मण सवदी कर्नाटक,स्मरणिका प्रकाशन करण्यात येणार आहे आमदार महेंद्र कल्लाप्पा तमन्नावर,(कुडची विधानसभा) कर्नाटक यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.










