आमदार निलेश राणे यांच्या संकल्पनेतून गेली १७ वर्षे साजरा केला जात आहे सार्वजनिक गणेशोत्सव
कुडाळ प्रतिनिधी
कुडाळ येथे विराजमान होणाऱ्या सिंधुदुर्ग राजाच्या मंडप उभारणीचा शुभारंभ नुकताच संपन्न झाला. आमदार निलेश राणे यांच्या संकल्पनेतून गेली सतरा वर्ष सिंधुदुर्ग राजा गणरायाची प्रतिष्ठापना केली जाते.
कुडाळ येथे मुंबईच्या लालबाग राजाच्या धर्तीवर सिंधुदुर्ग राजाची प्रतिष्ठापना केली जात आहे दरवर्षी गणरायाची मनोभावे पूजा केली जाते यावर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये गणरायाचे आगमन होणार आहे या पार्श्वभूमीवर कुडाळ येथील महायुती कार्यालया समोरील पटांगणात सिंधुदुर्ग राजाची प्रतिष्ठापना केली जाणार आहे त्यामुळे मंडप उभारणी सुरुवात करण्यात आली आहे आणि याचा शुभारंभ आज (शुक्रवारी) विधिवत श्रीफळ वाढवून करण्यात आला.
यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अरविंद करलकर, कुडाळ तालुकाप्रमुख विनायक राणे, भाजपचे तालुकाध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, शिवसेनेचे ओरोस विभागाचे प्रमुख दीपक नारकर, कुडाळ शहर प्रमुख ओंकार तेली, भाजप युवा मोर्चाचे रुपेश कानडे, शिवसेना युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष संग्राम साळसकर, विनायक घाडी, राकेश नेमळेकर, नगरसेवक गणेश भोगटे, राकेश कांदे, युवा सेनेचे वालावलकर, चंदन कांबळी, प्रथमेश कांबळी, स्वरूप वाळके, प्रसन्ना गंगावणे आदी उपस्थित होते.













