देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त रत्नागिरीत शालेय गणवेश आणि साहित्य वाटप

रत्नागिरी: भारतीय जनता पार्टी आणि जय हो प्रतिष्ठान यांच्या वतीने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त रत्नागिरी शहर प्रभाग क्रमांक ६ मधील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शालेय गणवेश आणि शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम उद्या, २२ जुलै रोजी सायंकाळी ५:३० वाजता दामले विद्यालयासमोर असलेल्या जोगळेकर हॉल येथे आयोजित करण्यात आला आहे.
जय हो प्रतिष्ठान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि आयटी जिल्हाप्रमुख निलेश आखाडे यांच्या माध्यमातून हे शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे.
या कार्यक्रमाला भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, शहराध्यक्ष दादा ढेकणे, जय हो प्रतिष्ठानचे प्रमुख राजू भाटलेकर आणि महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष वर्षाताई ढेकणे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या समाजोपयोगी कार्यक्रमासाठी भाजपचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, प्रभाग क्रमांक ६ मधील नागरिक आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.