ज्ञानदीप महाविद्यालयात सायबर सेक्युरिटी आणि बालगुन्हेगारी यंत्रणा या विषयावर मार्गदर्शनपर कार्यक्रम संपन्न*

ज्ञानदीप महाविद्यालयाच्या आजीवन अध्ययन आणि विस्तार विभाग व ध्येय संकल्प फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सायबर सेक्युरिटी आणि बालगुन्हेगारी यंत्रणा या विषयावर मार्गदर्शनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून खेड पोलीस स्टेशनचे पीआय मा. श्री. विवेक अहिरे हे उपस्थित होते. प्रमुख मार्गदर्शक पीआय मा. श्री. विवेक अहिरे तसेच उपस्थित सर्व मान्यवरांचा सत्कार प्रा. डॉ. उमेशकुमर बागल यांच्या हस्ते करण्यात आला.
पीआय श्री. विवेक आहिरे यांनी सायबर गुन्हेगारीचे वाढते प्रमाण, ऑनलाईन फसवणूक, सोशल मिडिया सुरक्षितता तसेच सायबर सुरक्षा व उपाययोजना तसेच बालगुन्हेगारी याविषयी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना इंटरनेटचा सुरक्षित वापर कसा करावा याबाबत मार्गदर्शन करताना सावधगिरीचे महत्त्व पटवून दिले. तसेच इंटरनेट व इतर सोशल मिडिया यांचा वापर मर्यादित करून चांगल्या कार्यासाठी त्याचा वापर करण्याचे आव्हानही त्यांनी विद्यार्थ्यांना केले. प्रा. डॉ. उमेशकुमार बागल यांनी ज्ञानदीपचे विद्यार्थी इंटरनेट तसेच सोशल मीडियाचा वापर समाजहितासाठीच करतील अशी ग्वाही देऊन ज्ञानदीप एक सुजाण नागरिक घडवण्याचा प्रयत्न करत असते असे सांगितलॆ.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ध्येय संकल्प फाउंडेशनचे श्री. बाळू सनगरे यांनी केले तसेच सूत्रसंचालन कु. रीदा जसनाईक हिने तर आभार प्रदर्शन कु. युसरा ढेणकर हिने केले. या कार्यक्रमासाठी ज्ञानदीप औषधनिर्माण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुजित नगरे, श्री. समीर कदम, श्री. अक्षय मोरे, श्री. सतिष आंब्रे, डॉ. श्री. मच्छिंद्र गोवळकर, श्री. सुरज जोगळे, श्री. दीपेश निकम, पोलीस कॉन्स्टेबल श्री. विकास पवार तसेच महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
संस्थेचे अध्यक्ष श्री. अरविंद तोडकरी, उपाध्यक्ष डॉ. रमणलाल तलाठी, संस्थेचे सरचिटणीस श्री. माधव पेठे, संस्थापक सरचिटणीस श्री. प्रकाश गुजराथी, महाविद्यालय नियामक मंडळाचे चेअरमन श्री. दीपक लढढा, संस्थेचे सर्व सभासद व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय अनंत कुलकर्णी यांचेकडून या उपक्रमाचे विशेष कौतुक करण्यात आले.