श्रावण महिन्याच्या शुभारंभाच्या निमित्ताने प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय, महाड नाका, खेड येथे २५ ते २७ जुलै दरम्यान तीन दिवसीय राजयोग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात शिव परमात्म्याचा खरा परिचय, त्याच्याशी असलेले आपले नाते आणि बुद्धीयोगाच्या माध्यमातून थेट शिव परमात्म्याशी कनेक्शन कसे साधता येईल, याचे मार्गदर्शन दिले जाणार आहे.
या शिबिरादरम्यान सहभागी व्यक्तींना शांती, आनंद आणि आध्यात्मिक वारशाचा प्रत्यक्ष अनुभव घेता येणार आहे. शिबिरासाठी कोणतीही फी नाही आणि नागरिकांना तीन वेळांपैकी कोणत्याही एका वेळेत सहभागी होता येणार आहे. वेळा म्हणजे सकाळी ९ ते १०, दुपारी ३ ते ४ आणि सायंकाळी ६ ते ७ अशी निश्चित करण्यात आली आहेत.
ब्रह्माकुमारी गीता बहिणजी यांनी नागरिकांना या अध्यात्मिक शिबिरात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. श्रावणाच्या पावन काळात परमात्म्याशी थेट संबंध जोडण्याची ही अनोखी संधी असल्याचे त्यांनी सांगितले.










