रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर कायम: मंडणगडमध्ये सर्वाधिक पाऊस

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आज, २४ जुलै २०२५ रोजी पावसाने हजेरी कायम ठेवली आहे. जिल्ह्यातील नऊ तालुक्यांमध्ये एकूण ६६१.१६ मिमी पावसाची नोंद झाली असून, सरासरी ७३.४६ मिमी पाऊस झाला आहे.
आज सकाळी संपलेल्या २४ तासांत मंडणगड तालुक्यात सर्वाधिक १०५.०० मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर गुहागर तालुक्यात सर्वात कमी, म्हणजेच ४९.२० मिमी पाऊस झाला आहे.
जिल्ह्यातील इतर तालुक्यांमधील पावसाची स्थिती खालीलप्रमाणे:
* खेड: ७२.१४ मिमी
* दापोली: ८०.५७ मिमी
* चिपळूण: ८४.२२ मिमी
* संगमेश्वर: ५८.९१ मिमी
* रत्नागिरी: ५५.५५ मिमी
* लांजा: ६३.२० मिमी
* राजापूर: ९२.३७ मिमी
जिल्ह्यात सर्वदूर पाऊस होत असल्याने शेतीच्या कामांना गती मिळाली असून, पाणीसाठा वाढण्यास मदत होत आहे. हवामान खात्याने पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज वर्तवला आहे.