गौरव पोंक्षे माखजन
संगमेश्वर तालुक्यातील आंबव पोंक्षे गावात ग्रामविकास या विषयावर ,कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा मधील अंबवडे गावचे माजी सरपंच धनाजी वसंतराव गुरव यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
हे व्याख्यान २७ जुलै रोजी सकाळी ११ वाजता आंबव पोंक्षे येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत होणार आहे.ह्या व्याख्यानाचे आयोजन आंबव पोंक्षे ग्रामपंचायतीमार्फत करण्यात आले आहे.अशी माहिती सरपंच शेखर उकार्डे यांनी दिली.
व्याख्याते धनाजी गुरव ह्यांनी पद्मश्री पोपटराव पवार,हिवरे बाजार यांच्या बरोबर आदर्श गाव संकल्पनेत सहभाग घेतला होता.ग्रामस्वछता अभियानात राज्यात त्यांचा द्वितीय क्रमांक आला होता.अनेक पुरस्कार प्राप्त, धनाजी गुरव यांचे विचार,अनुभव आंबव पोंक्षे ग्रामस्थांना ऐकण्याची संधी प्राप्त झाली आहे.












