अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयात ‘इतिहास शोध आणि बोध अभियान मंडळा’चे उद्घाटन

रत्नागिरी :
​अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालय आणि गोगटे जोगळेकर वरिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने इतिहास शोध आणि बोध अभियान मंडळाच्या उद्घाटन कार्यक्रम महाविद्यालयामध्ये संपन्न झाला. याप्रसंगी लोकमान्य टिळक जयंती निमित्त पत्रकार आणि लेखक श्री. राजेंद्रप्रसाद मसूरकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले. यावर्षीच युनेस्कोने छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांचा समावेश संरक्षित स्मारकामध्ये केला आहे. या किल्ल्यांची माहिती देणारे भितीपत्रक महाविद्यालयामध्ये प्रदर्शित करण्यात आले. तसेच यानिमित्त आयोजित केलेल्या निबंध स्पर्धेला वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनींचा चा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या निबंध स्पर्धेचा निकाल- गट १ – कनिष्ठ महाविद्यालय प्रथम – कु. आदिती जितेंद्र पाटील (11वी विज्ञान)
द्वितीय – कु. रिया अनंत पांचाळ (11वी विज्ञान) तृतीय – कु. श्रावणी योगेश खांडेकर (12वी कला)
उत्तेजनार्थ 1) कु. प्रणव अंकुश हातिसकर (११वी वाणिज्य) २) कु. तन्वी उपेंद्र पाटकर (१२वी विज्ञान)
३) कु. सरगम महेश कांबळे (१२वी कला.)
गट २ वरिष्ठ महाविद्यालय प्रथम – कु. सानिका अनंत पांचाळ द्वितीय – कु. आसिया ईरशाद अत्तरवाले
तृतीय – कु. सृष्टी जयदास पाटील उत्तेजनार्थ कु. नेहा संदीप पवार
​याप्रसंगी बोलताना श्री. राजेंद्रप्रसाद मसूरकर यांनी ‘लोकसंग्रही लोकमान्य’ या विषयावर आपले विचार मांडले. निर्भीड पत्रकार , अभ्यासू वकील तसेच लोकपुढारी म्हणून काम करताना ‘लोकसंग्रह’ या टिळकांच्या पैलूवर प्रत्यक्ष घटना आणि त्याचे तपशील याद्वारे श्री. मसुरकर यांनी प्रकाश टाकला. जुन्या साहित्याचेही इतिहास प्रेमी विद्यार्थ्यांनी आवर्जून वाचन करावे असे आवाहन त्यांनी केले.
​उद्घाटन प्रसंगी माननीय प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी मंडळाचे पुढील सर्व कार्यक्रम कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयाचे मिळून होतील असे जाहीर केले आणि मंडळाच्या आगामी कार्यक्रमांसाठी शुभेच्छा दिल्या. कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री. सुनील गोसावी यांनी आपल्या मार्गदर्शन पर भाषणात मंडळाच्या गतवर्षीच्या कार्यक्रमांची ओळख नवीन विद्यार्थ्यांना करून द्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली.
​कार्यक्रमाचे प्रास्ताविक समन्वयक श्री. निनाद तेंडुलकर यांनी केले. सूत्रसंचालन श्रीम. अन्वी कोळंबेकर, वक्ता परिचय श्रीम. मधुरा चव्हाण, आभारप्रदर्शन श्री. पंकज घाटे यांनी केले. याप्रसंगी इतिहास शोध आणि बोध अभियान मंडळाचे कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील सदस्य शिक्षक आणि विद्यार्थी तसेच इतिहास प्रेमी उपस्थित होते.