मळगांव येथील रहिवासी एकनाथ पेडणेकर यांचे निधन

सावंतवाडी :
मळगाव रेडकरवाडी येथील रहिवासी एकनाथ सावळाराम पेडणेकर (वय ७१) यांचे शुक्रवारी दुपारी एकच्या सुमारास गोवा बांबोळी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, मूलगी, जावई, सूना, भाऊ, वहिनी, नातवंडे, असा परिवार आहे. महावितरणचे शाखा अभियंता सावळाराम उर्फ आबा पेडणेकर तसेच विनय पेडणेकर यांचे ते वडील होत.