गौरव पोंक्षे l माखजन : प्रत्येक गावांना निसर्गाने भरभरून दिल आहे.पण केवळ नियोजनाच्या दुष्काळामुळेच ग्रामविकास विकास थांबलाय अस परखड मत धनाजी गुरव यांनी व्यक्त केल.यावेळी व्यसपीठावर सरपंच शेखर उकार्डे,उपसरपंच मंगेश मांडवकर,मुख्याध्यापिका सौ प्राची पाटणकर,आत्माराम धुलप ,सौ प्रिया सुवरे आदी उपस्थित होते.
श्री धनाजी गुरव पुढे म्हणाले की,ज्या गावात पूर्ण पावसात ३००ते ५०० मिलिमीटर पाऊस पडतो त्या गावांनी क्रांती केली.पण कोकणात अलोट पाऊस पडतो पण ,ग्रामविकास आणि क्रांती झालेली दिसून येत नसल्याचे खंत व्यक्त केली.हे केवळ पाण्याचे नियोजन नसल्याने होत असल्याचे त्यांनी सांगितले.ग्रामविकास साधताना निसर्ग जपला गेला पाहिजे.ग्रामविकास असाच होणार नाही,त्यासाठी प्रत्येकाने काम करायला हवे,प्रत्येकाने कुणासाठी तरी काम करायला हवं ,तर विकास झाल्याशिवाय राहणार नाही.शासनाच्या प्रत्येक योजना गावागावात प्रभावी पणे राबवल्या गेल्या पाहिजेत.ज्या गावात फारशी नैसर्गिक सुबत्ता नाही अशा गावांनी सुयोग्य नियोजन केल्याने,राज्यात आदर्श गाव म्हणून नावलौकिक मिळवला आहे.आपल्या गावात निसर्गाने तर भरभरून दिल आहे.आपण ही सुयोग्य व्यवस्थापन करा की जेणे करून आपणही संपन्न गाव म्हणून पुढे येऊ शकू. दरम्यान या कार्यक्रमात पीक विमा योजनेसंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमामध्ये पीक विमा संदर्भात भारतीय कृषी विमा कंपनी चे जिल्हा समन्वयक प्रतिकेश शिगवण,विघ्नेश फटकरे
या कार्यक्रमाला ग्रामसेवक अभिजित चव्हाण,ग्रामपंचायत सदस्य ,दीपाली कुडतडकर,प्रिया सुवरे,निधी भायजे, अंगणवाडी सेविका वेदिका भायजे,वैभवी तांबे,आशा सेविका रुपाली कुडतडकर,अनघा नेटके,पूर्वा भुवड,दामिनी विभूते,जिल्हा परिषदेच्या आंबव पोंक्षे शाळेचे प्राथमिक शिक्षक,गावातील ग्रामस्थ,उपस्थित होते.
या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन ,स्वागतगीताने झाली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच शेखर उकार्डे यांनी केले.तर आभार सौ प्राची पाटणकर यांनी मानले.













